Tuesday, May 19, 2026

सांग बरं देवा कुठे आहेस तू

 सांग बरं देवा कुठे आहेस तू

तुझ्याच दारात बरे बसतात लाचार गोर गरीब

कोणी नशिबाने गरीब कोणी पैशाने 

प्रारब्ध कर्म ह्याचा असेल सर्व खेळ

का बरं हवा मग तुझ्या सोबत मेळ 

सांग बरं देवा कुठे आहेस तू

तुझ्याच पवित्र कुंभ पर्वात

आई बाप बरे हरवतात

तुझ्या दारा समोर बरे 

अनाथ चिमुकली बागडतात

सांग बरं देवा जरा कुठे आहेस तू

लाज सारी वेशीवर टांगून

तुझ्याच दारा समोर बऱ्या 

छोट्या बालिका भीक मागतात

व्याधींनी त्रस्त सारे कसे 

दारात तुझ्याच लोळतात 

सांग बरं देवा जरा कुठे आहेस तू

बाजार मांडतात तुझा सारे

घरात तुझ्याच कसा रे 

पूजा अभिषेक सारेच घेतात

भक्ती भावाच्या किमतीने

तरी समोर बसून बघतोस

उघड्या डोळ्याने सारे ते

सांग ना रे देवा जरा

म्हणतात तसे असतोस ना तू खरच

 प्रामाणिक प्रार्थने मध्ये 

बाळांच्या निरागस नजरे मध्ये

आई बापाच्या आर्त हाके मध्ये

निष्पाप चिमुकल्यांच्या काळजा मध्ये

सांग ना रे देवा तू....

कधीतरी बोल आमच्याशी तू

असंख्य अशा प्रश्नांची 

उत्तरे पण दे जरा तू....

आरे!!! 

का तुझ्या कडे पण आले

गुगल What's app आणि insta

रंभा उर्वशी चे reels बघण्यात 

तू पण मग्न का झालास 

माणसा सारखा तू पण का

माणसा पासून दूर गेलास ..... 


काय मिळवलं माणसांनी

 काय मिळवलं माणसांनी

असं काय मिळवलं माणसांनी 


रस्ते केले आणि गावं हरवलं 

गावं हरवलं तसं माणूसच हरवला

लाईट च्या झगमगाटात इवलीशी 

मिणमिणती पणती हरवली

पणती हरवली तशी शांतताच हरवली

नदी चे प्रवाह बदलले 

डोंगरांचे ही पठार केले

जंगलांचे resort झाले

DJ च्या आवाजात 

निसर्गाचे धिंडवडे निघाले..

मोबाईल आणले आणि 

गावात जमणारा कट्टा हरवला

असंख्य tv channel मध्ये 

रात्रीच चांदण हि हरवलं 

LPG चा सिलेंडर आला आणि

चुलीवरच्या धुरड्यात फुंकणी ने 

पेटलेला विस्तव हरवलच....

Geyser solar सोबत 

तांब्याच्या त्या बांबातला धूर ही हरवला



कुठेतरी हळुवार शांत प्रकाश 

त्या लांब झोपडीतला बोलावतो मला

त्या प्रकाशातल्या सावल्या 

माणसांपेक्षा जवळ वाटतात

त्या समोर बसलेल्या प्रेमळ आजी

ओळख नसतांना ही हव्या हव्याशा वाटतात

निरागस डोळ्यात प्रेम मावत नाही

त्यांच्या शब्दां मधून आपल्या सारखा

व्यवहाराचा वास येत नाही...

येणारे जाणारे सर्वच अतिथी देवो भव 

आणि वसुधैव कुटुंबकम संस्कृती जपणारे

डोळे आता थकले 

व्यवहारी जगात ते सुद्धा हरवलेच की...

आज तेच डोळे मिटता मिटता मला विचारतात 

काय मिळवलास रे मनसा 

असं काय मिळवलास ...

देवांनी दिलेल खाऊन 

त्याच्या मिठाला जागला नाही

अरे निसर्ग कोपला तर...

तू पण असाच हरवशील की....





Thursday, November 21, 2024

Prayers



In the silence of my prayers
I seek blessings in many layers
Some for my family
N some for a friend
Some for the world existing
N some for them
Whose world is yet to exist..

In the silence of my prayer
I close my eyes
N feel the truth n lies
Of The life that unfolds
Each new day with each new layer

In the silence of my prayers
When the mind drifts in trance
When the darkness penetrates eyes
When bodily heavyness drops it's hues
Then the light enters in my heart
My silent prayers seem answered
Leaving my heart calm n unbothered

And when I open my eyes
A thought runs across
Of My silent prayers
For whom they belong
My family n my friend
My world to my next gen
Does that make me

A selfish gentleman?  

धर्म युद्ध

 


आजचे धर्म युद्ध थोडे वेगळे आहे
ना राम आहे ना रावण आहे
ना कौरव ना पांडव
तरी पण युद्ध आहे धर्माचे
युद्ध आहे सत्तेचे

माणूस माणूस म्हणवणारा प्राणी
आज उरला आहे प्राणीच
शब्दाच्याही पलीकडे त्याचे वागणे
माणसातील माणूस हरवला आहे

स्वतः चे रक्षण करण्या
उभा आज प्रत्येक जण आहे
याच बुरख्या खाली लपवला
त्यानही संधीचा तो क्षण आहे

आपला राम मागे राहिला तरी चालेल
बाबर मात्र मोठा व्हायला हवा
घरचे उघयावर झोपले तरी बेहत्तर
शेजार श्रीमंत झालेला हवा

शरीराने भारतीय मनाने परकीय
असे बंधु आज जाहले
माझ्या मातेचे तुकडे करण्या
बांधव हेच पुढे सरसावले

धर्मनिरपेक्ष म्हणजे काय
याची जाण नाही कोणाला
तुझा धर्म भला तुला
परी माझा धर्म मला प्यारा
करीन रक्षण स्व धर्माचे
आदर करित तुझ्या धर्माचे

आज सीते ने धनुष्य उचलावे
द्रौपदीने ने युद्ध स्वत:च पुकारवे
ना येथे राम राहीला
ना सखा कोणी कृष्ण पहिला
रहीम मात्र नक्की सरसावणार
एक नरेंद्र एक योगी
असे किती दूरवर चालणार

धर्म युद्ध हे नवीन असे
सर्वच अधर्मी असती येथे
सारेच परके कोणी न आपले
युद्ध म्हणूनच हे एकट्याचे

शेवट कसा कुठे असे
कोणास काही माहीत नसे
मर्यादा पुरुषोत्तम आणि धर्मराज
हताश होऊन गेले आज.

प्रसन्न प्रिया

 


आयुष्याच्या एका वळणावर
दोघे आपण समीप आलो....
एकमेका सांभाळून उभे
कसे कधी एकरूप झालो...

निवांत अश्या काही क्षणा
दोघे पुन्हा नव्याने भेटू
गतक्षणांचे चित्र पुन्हा
नव्याने अनुभवू

साता जन्माची साथ आपली
एकमेका साठीच जणू
गाठ आपली
आयुष्याच्या या वळणावर
पुन्हा नव्याने भेट आपली

कोण मी

 


काल रात्री माझ्यातला मी
झोपलेल्या मला न्याहाळत होतो
थोडा वेगळा होऊन माझ्या पलीकडे
मी मला ओळखायचा प्रयत्न करत होतो

बाळ मी, तरुण मी, प्रौढ मी
बळवडीतला मी, शाळेतला मी,
महाविद्यालयातला मी,
CA चा सरावच करणारा CA मी.....

पाल्य मी, मित्र मी, भाऊ मी
नवरा मी, वडील मी, काका मी,
मामा मी, आजोबा मी,
मानलेला भाऊ मी
सर्वात जवळचा मित्र मी
सखा मी
Sir ही मी...
कदचित कोणासाठी
शत्रू ही मीच

हा मी....
माझ्या समोर झोपलेला...
एका क्षुद्र शरीरा पलीकडे
काहीही नसलेला मी...
मीही मग ओशाळलो
मला बघून बराच हादरलो....
वाटले अजूनही अशिक्षित मी
खूप शिकून सुद्धा अडाणी मी

तेव्हा ठरवले ... मी मला इथेच सोडायचे
मग भगवंताला शरण जायचे
सर्व नाती त्याला अर्पण
मी फक्त भक्त व्हायचे
त्याला असे एकरूप व्हायचे
जणू झोपलेल्या मी मध्ये
मला त्याचेच दर्शन व्हायचे......

मला भेटलेल्या नव दूर पैकी एक - गौरी

सांगतो कथा तुम्हांस ऐका
एका वाघिणी ची गोष्ट
झुंज देऊन आयुष्य जिंकणाऱ्या
झांशी च्या राणीची हो गोष्ट
मला भासणाऱ्या
नवदुर्गा पैकी एका
दुर्गेची ही गोष्ट !!

बालपण सरले सुखाचे
मायेच्या सावलीत आनंदाचे
आई बाबांचा स्वाभिमान जशी
लाख मोलाची लेक अशी
श्वास असे त्या दोघांचा!!

कसे न कळे कधी उडाली
सहजच पंख पसरूनी
आकाशी ... झेप घेतली पाखराने
जोड त्याला संस्काराची !!

शिकून घेतले सारे औपचारिक
आणि घेतले व्यवहारातील धडे
परी नशिबी काय असावे
आयुष्य कसे हे पुढे घडे
कोणालाही न उलगडलेले
अनाकलनीय असे हे कोडे....!!

असे चाणाक्ष परी लाखात देखणी
तितकीच धाडसी असे स्वाभिमानी
असे खंबीर परी हसरी
निर्मळ मन आणि प्रेमळ नाती
सांभाळून स्वतःला जिंकते सर्वाना
अशीच घडली "हेमा" घरी
सर्वांची लाडकी प्रेमळ परी !!

अशी ही "हेमा" झाली "गौरी"
नवीन घरटे नवीन नाती   
नवीन साऱ्या जमणार आठवणी 
नियती चे मग रंग खरे...
उधळले सारे गौरी वरी !!

सुखी संसाराचे स्वप्न
स्वप्न परी राहिले
दिवस उमेदीचे सारे तिने
घरा साठी वाहिले
कष्ट अपार सोसिले तिने
पिल्लां साठी वेचीले आपले
क्षण क्षण आयुष्य सारे !!

घर .... नोकरी
पैसा...शिक्षण
वेळ कुठे कसा पुरे
ना विश्रांती ना उसंत
लेकरांसाठी जीव तळमले
त्यातही ..
चंदेरी किनार त्या जीवाला
सासरचे तिला पाठबळ मिळाले !!

मुखी सदा हास्य फुले
आणि सवे संगीत दरवळे
गुपित सांगे जगण्याचे
कित्येकासी धीर मिळे
केव्हा कुठे काय करावे
आणि कसे कधी वागावे
हे ही शिकावी तिचे वागणे !!!

पिल्ले ही हुशार
सुंदर देखणी
स्वतःच आयुष्याची केली लेखणी
आईचे -- आईपण जपले त्यांनी
मातृत्वचे असे केले सार्थक त्यांनी..

सरस्वती ने मग रूप आपले
गौरी मधून तिथे फुलविले.
सार्थकी झाले क्षण क्षण कष्टाचे
सोने झाले उभ्या आयुष्याचे !!

अशी ही गौरी
अशी ती हेमा
नावदुर्गा म्हणून साजे
नावा परी देवी जणू
मज ही साक्षात दुर्गा भासे !!!