Thursday, November 21, 2024

धर्म युद्ध

 


आजचे धर्म युद्ध थोडे वेगळे आहे
ना राम आहे ना रावण आहे
ना कौरव ना पांडव
तरी पण युद्ध आहे धर्माचे
युद्ध आहे सत्तेचे

माणूस माणूस म्हणवणारा प्राणी
आज उरला आहे प्राणीच
शब्दाच्याही पलीकडे त्याचे वागणे
माणसातील माणूस हरवला आहे

स्वतः चे रक्षण करण्या
उभा आज प्रत्येक जण आहे
याच बुरख्या खाली लपवला
त्यानही संधीचा तो क्षण आहे

आपला राम मागे राहिला तरी चालेल
बाबर मात्र मोठा व्हायला हवा
घरचे उघयावर झोपले तरी बेहत्तर
शेजार श्रीमंत झालेला हवा

शरीराने भारतीय मनाने परकीय
असे बंधु आज जाहले
माझ्या मातेचे तुकडे करण्या
बांधव हेच पुढे सरसावले

धर्मनिरपेक्ष म्हणजे काय
याची जाण नाही कोणाला
तुझा धर्म भला तुला
परी माझा धर्म मला प्यारा
करीन रक्षण स्व धर्माचे
आदर करित तुझ्या धर्माचे

आज सीते ने धनुष्य उचलावे
द्रौपदीने ने युद्ध स्वत:च पुकारवे
ना येथे राम राहीला
ना सखा कोणी कृष्ण पहिला
रहीम मात्र नक्की सरसावणार
एक नरेंद्र एक योगी
असे किती दूरवर चालणार

धर्म युद्ध हे नवीन असे
सर्वच अधर्मी असती येथे
सारेच परके कोणी न आपले
युद्ध म्हणूनच हे एकट्याचे

शेवट कसा कुठे असे
कोणास काही माहीत नसे
मर्यादा पुरुषोत्तम आणि धर्मराज
हताश होऊन गेले आज.

No comments:

Post a Comment