Thursday, November 21, 2024

कोण मी

 


काल रात्री माझ्यातला मी
झोपलेल्या मला न्याहाळत होतो
थोडा वेगळा होऊन माझ्या पलीकडे
मी मला ओळखायचा प्रयत्न करत होतो

बाळ मी, तरुण मी, प्रौढ मी
बळवडीतला मी, शाळेतला मी,
महाविद्यालयातला मी,
CA चा सरावच करणारा CA मी.....

पाल्य मी, मित्र मी, भाऊ मी
नवरा मी, वडील मी, काका मी,
मामा मी, आजोबा मी,
मानलेला भाऊ मी
सर्वात जवळचा मित्र मी
सखा मी
Sir ही मी...
कदचित कोणासाठी
शत्रू ही मीच

हा मी....
माझ्या समोर झोपलेला...
एका क्षुद्र शरीरा पलीकडे
काहीही नसलेला मी...
मीही मग ओशाळलो
मला बघून बराच हादरलो....
वाटले अजूनही अशिक्षित मी
खूप शिकून सुद्धा अडाणी मी

तेव्हा ठरवले ... मी मला इथेच सोडायचे
मग भगवंताला शरण जायचे
सर्व नाती त्याला अर्पण
मी फक्त भक्त व्हायचे
त्याला असे एकरूप व्हायचे
जणू झोपलेल्या मी मध्ये
मला त्याचेच दर्शन व्हायचे......

No comments:

Post a Comment