एका वाघिणी ची गोष्ट
झुंज देऊन आयुष्य जिंकणाऱ्या
मला भासणाऱ्या
नवदुर्गा पैकी एका
दुर्गेची ही गोष्ट !!
बालपण सरले सुखाचे
मायेच्या सावलीत आनंदाचे
आई बाबांचा स्वाभिमान जशी
लाख मोलाची लेक अशी
श्वास असे त्या दोघांचा!!
कसे न कळे कधी उडाली
सहजच पंख पसरूनी
आकाशी ... झेप घेतली पाखराने
जोड त्याला संस्काराची !!
शिकून घेतले सारे औपचारिक
आणि घेतले व्यवहारातील धडे
परी नशिबी काय असावे
आयुष्य कसे हे पुढे घडे
कोणालाही न उलगडलेले
अनाकलनीय असे हे कोडे....!!
असे
चाणाक्ष परी लाखात देखणी
तितकीच
धाडसी असे स्वाभिमानी
असे
खंबीर परी हसरी
निर्मळ
मन आणि प्रेमळ नाती
सांभाळून
स्वतःला जिंकते सर्वाना
अशीच
घडली "हेमा" घरी
सर्वांची
लाडकी प्रेमळ परी !!
अशी
ही "हेमा" झाली "गौरी"
नवीन
घरटे नवीन नाती
नवीन
साऱ्या जमणार आठवणी
नियती चे मग रंग खरे...
उधळले
सारे गौरी वरी !!
सुखी
संसाराचे स्वप्न
स्वप्न
परी राहिले
दिवस
उमेदीचे सारे तिने
घरा
साठी वाहिले
कष्ट
अपार सोसिले तिने
पिल्लां
साठी वेचीले आपले
क्षण
क्षण आयुष्य सारे !!
घर
.... नोकरी
पैसा...शिक्षण
वेळ
कुठे कसा पुरे
ना
विश्रांती ना उसंत
लेकरांसाठी
जीव तळमले
त्यातही
..
चंदेरी
किनार त्या जीवाला
सासरचे
तिला पाठबळ मिळाले !!
मुखी
सदा हास्य फुले
आणि
सवे संगीत दरवळे
गुपित
सांगे जगण्याचे
कित्येकासी
धीर मिळे
केव्हा
कुठे काय करावे
आणि
कसे कधी वागावे
हे
ही शिकावी तिचे वागणे !!!
पिल्ले
ही हुशार
सुंदर
देखणी
स्वतःच आयुष्याची
केली लेखणी
आईचे
-- आईपण जपले त्यांनी
मातृत्वचे
असे केले सार्थक त्यांनी..
सरस्वती
ने मग रूप आपले
गौरी
मधून तिथे फुलविले.
सार्थकी
झाले क्षण क्षण कष्टाचे
सोने
झाले उभ्या आयुष्याचे !!
अशी
ही गौरी
अशी
ती हेमा
नावदुर्गा
म्हणून साजे
नावा
परी देवी जणू
मज
ही साक्षात दुर्गा भासे !!!
No comments:
Post a Comment