Thursday, August 18, 2022

random thoughts

Railway मध्ये उलटं बसल्यावर कसं होतं ना ... काय येतंय समजत नाही.... आपल्या खिडकीतून दिसत दिसत.., बघता बघता ....निघून जात.... अगदी डोळ्यात भरे पर्यंत दृष्टीक्षेपात पण राहत नाही. 
आयुष्यात काही क्षण असेच निघून जातात... सर आली आली म्हणे पर्यंत न भिजवता निघून जाते. मन भरेस्तोवर अनुभव घ्यायचा आधीच ते दृष्टीक्षेपात पण राहत नाही. 
पण कधी वाटत की काही क्षण असेच हवेत.... स्पर्श न होता सर्र कन निघून जावेत. 
रेल्वे ची काय मज्जा असते ना... जवळचे सगळे भरभर निघून जाते... लांब लांब चे विखुरलेले मात्र रेंगाळत राहते...हळू हळू.... पुसट होते खरे पण रेंगाळते....आयुष्यातल्या क्षणा सारखे..... 
या सगळ्यात उतरायचे कुठे ... थांबायचे कुठे.... समजायला हवे. 

पाऊस ओला

मी भिजवून घेतले स्वतः
तू मात्र त्या छत्रीत ओली
निथळून गेलो संपूर्ण
तू मात्र तिळमात्र न्हाली
दाटले सर्वत्र धुके घनदाट
अन हाती आला तुझाच हात..
सुखावलो..... हरवलो
....रेंगाळलो आणि भुलत गेलो
शब्दा शब्दाला तुझ्या 
असा हरवत गेलो
स्वप्नात कड्यांना गुंफत गेलो

धुके ही मग विरळ झाले
सोनेरी उन्हाचे कवडसे पसरले
स्वप्नवत सारे कसे 
घटकेत ते पुरते सरले

तू त्या छत्री खाली
उभी एका सावली पाशी
मी मात्र चिंब ओला
दूर कुठेतरी एकाकी ....