सांग बरं देवा कुठे आहेस तू
तुझ्याच दारात बरे बसतात लाचार गोर गरीब
कोणी नशिबाने गरीब कोणी पैशाने
प्रारब्ध कर्म ह्याचा असेल सर्व खेळ
का बरं हवा मग तुझ्या सोबत मेळ
सांग बरं देवा कुठे आहेस तू
तुझ्याच पवित्र कुंभ पर्वात
आई बाप बरे हरवतात
तुझ्या दारा समोर बरे
अनाथ चिमुकली बागडतात
सांग बरं देवा जरा कुठे आहेस तू
लाज सारी वेशीवर टांगून
तुझ्याच दारा समोर बऱ्या
छोट्या बालिका भीक मागतात
व्याधींनी त्रस्त सारे कसे
दारात तुझ्याच लोळतात
सांग बरं देवा जरा कुठे आहेस तू
बाजार मांडतात तुझा सारे
घरात तुझ्याच कसा रे
पूजा अभिषेक सारेच घेतात
भक्ती भावाच्या किमतीने
तरी समोर बसून बघतोस
उघड्या डोळ्याने सारे ते
सांग ना रे देवा जरा
म्हणतात तसे असतोस ना तू खरच
प्रामाणिक प्रार्थने मध्ये
बाळांच्या निरागस नजरे मध्ये
आई बापाच्या आर्त हाके मध्ये
निष्पाप चिमुकल्यांच्या काळजा मध्ये
सांग ना रे देवा तू....
कधीतरी बोल आमच्याशी तू
असंख्य अशा प्रश्नांची
उत्तरे पण दे जरा तू....
आरे!!!
का तुझ्या कडे पण आले
गुगल What's app आणि insta
रंभा उर्वशी चे reels बघण्यात
तू पण मग्न का झालास
माणसा सारखा तू पण का
माणसा पासून दूर गेलास .....
No comments:
Post a Comment