Tuesday, May 19, 2026

काय मिळवलं माणसांनी

 काय मिळवलं माणसांनी

असं काय मिळवलं माणसांनी 


रस्ते केले आणि गावं हरवलं 

गावं हरवलं तसं माणूसच हरवला

लाईट च्या झगमगाटात इवलीशी 

मिणमिणती पणती हरवली

पणती हरवली तशी शांतताच हरवली

नदी चे प्रवाह बदलले 

डोंगरांचे ही पठार केले

जंगलांचे resort झाले

DJ च्या आवाजात 

निसर्गाचे धिंडवडे निघाले..

मोबाईल आणले आणि 

गावात जमणारा कट्टा हरवला

असंख्य tv channel मध्ये 

रात्रीच चांदण हि हरवलं 

LPG चा सिलेंडर आला आणि

चुलीवरच्या धुरड्यात फुंकणी ने 

पेटलेला विस्तव हरवलच....

Geyser solar सोबत 

तांब्याच्या त्या बांबातला धूर ही हरवला



कुठेतरी हळुवार शांत प्रकाश 

त्या लांब झोपडीतला बोलावतो मला

त्या प्रकाशातल्या सावल्या 

माणसांपेक्षा जवळ वाटतात

त्या समोर बसलेल्या प्रेमळ आजी

ओळख नसतांना ही हव्या हव्याशा वाटतात

निरागस डोळ्यात प्रेम मावत नाही

त्यांच्या शब्दां मधून आपल्या सारखा

व्यवहाराचा वास येत नाही...

येणारे जाणारे सर्वच अतिथी देवो भव 

आणि वसुधैव कुटुंबकम संस्कृती जपणारे

डोळे आता थकले 

व्यवहारी जगात ते सुद्धा हरवलेच की...

आज तेच डोळे मिटता मिटता मला विचारतात 

काय मिळवलास रे मनसा 

असं काय मिळवलास ...

देवांनी दिलेल खाऊन 

त्याच्या मिठाला जागला नाही

अरे निसर्ग कोपला तर...

तू पण असाच हरवशील की....





No comments:

Post a Comment