इवलिशी ज्योत परी
अंधार सारा दूर करी
नावाप्रमाणे सारेच तुमचे
आयुष्य इतराचे उजळून देई!!
काम असो वा असो कला
साहित्य असो किंवा असो सेवा
परिस्थीती असो प्रतिकूल वा अनुकूल
निर्व्याज पणे केली त्यावर माया !!
शिकण्याचा तुमचा आग्रह
अन् शिकवण्याचा नवा उत्साह
ज्योती ने ज्योत लावीत
प्रकाश ही केला व्दिगुणित!!
अश्या या दैदिप्यमान जगण्याला
साथ लाभते
"प्रज्ञा" ची
जिच्या सवे सारेच सार्थ
अर्थ लाभे आयुष्याला!!
अंधाराचे अस्तित्व
दूर होते प्रकाशाने
कार्य तुमचे नावाला साजे
देव ही मज आज कृतज्ञ भासे!!
अनेकांचे आशीर्वाद
कित्येकांचे कृतज्ञ भाव
७५ वर्षे प्रकाशमान
त्यासाठीच हा कौतुकाचा वर्षाव!!
जगणे ही पण एक कला असे
प्रकाश प्रज्ञा दोघं सांगे
त्यांच्या आयुष्याच्या पानांची
“प्रसन्न” जणू स्वाक्षरी असे!!
No comments:
Post a Comment