Thursday, November 23, 2017

देव आहेस देवा सारखा वाग
आता जरा आपल्या कामाला लाग

मुसळधार बरसून जा
रान सारे फुलवून जा

नको चंद्र नको तारे
ढगांच्या अंधारात लपव सारे
अन नको त्या सूर्याची धग
दिवसाही बरसु दे तुझा शामल ढग

ये रे बाबा आता तरी ये
डोळे आभाळाकडे लावून
जीव आता शिणला रे

असंख्य भक्त तुझे
पशु पक्षी नि मनुष्य भले
नको खेळू जीवा त्यांच्या
आयुष्य वेचतील तुझ्याच सेवा
झाडे लावू, डोंगर जपू
जंगले वाढवू अन निसर्गात रुजू

पण ....
ये रे बाबा आता तरी ये
डोळे आभाळाकडे लावून
जीव आता शिणला रे

कहर तुझ्या सरींचा होऊन जाऊ देत
नद्या नाले रस्ते सगळे भर भरून वाहू देत
पृथ्वी ला या अभिषेक होऊ दे
सृष्टी सारी जिवंत होऊ  दे

शेती ला या खूप फलू दे
या शेतकऱ्याला हि थोड जगू दे

ये रे बाबा आता तरी ये
डोळे आभाळाकडे लावून
जीव आता शिणला रे








No comments:

Post a Comment