Thursday, November 23, 2017

का बरे झाले असेल असे
काय घडले असेल खरे

सोशल मीडिया वर सारे
तर्क वितर्क लावतील पुरे

आई बापाचे काळीज बापडे
शब्दा गणिक हृदयाला तडे

काय खरे नी काय खोटे
दुनियेस काय त्याचे पडे

दुःख ऊरी घेउनी सारे
आश्रु काळोख्यात लपवून सारे
पुन्हा पहाटे उभे राहावे
जगास साऱ्या काय सांगावे

की निमुट सारे सहन करावे
हितचिंतकांचे अकलेचे तारे
कि द्यावे सर्वाना उत्तर
वेशीवर टांगलंय
आमचे दुःख बेहत्तर

उसना का होईना
थोडा हळवेपणा बाळगा मनी
वेळ केव्हा काय आणेल
का सांगितलंय कोणी ?


No comments:

Post a Comment