पुन्हा तोच आवाज....
पुन्हा तोच चेहरा ...
.........ओळखीचा
पुन्हा तेच शब्द...
पुन्हा तीच वाक्य ...
............. ओळखीची
पुन्हा तेच प्रेम .....
पुन्हा तोच जिव्हाळा....
..............ओळखीचा
पुन्हा .... मीही तोच
स्वतःला ना उमजणारा ....
............. अनोळखी
प्रेमात पूर्ण झोकून देणारा...
तुझ्यात अलगद सामावून जाणारा...
पण ... स्वतःला न ओळखणारा ....
.............. अनोळखी...
No comments:
Post a Comment