आर्या ची order होती.... बाबा वडा पाव किंवा बर्गर खायला जायचय.... चल ना....
आधीच सर्दी नी बेजार खोकल्या नी हैराण झालेली पिल्लू माझी पायाच्या दुखण्याने फारच केविलवाणी वाटली.... Actually वाटलीच.... प्रत्यक्षात मात्र धीट आहे मनु... मग आम्ही ठरवलं... घरीच बर्गर करू....
साहित्य आणल... आर्या ला surprise.... म्हणुन सुरवात केली उत्त्सहानी.
इकडे अदिती टिकीया करत होती..मी bread la garnish करत होतो... पावला बटर लावता लावता...कालचा प्रसंग डोळ्यासमोर आला.... एका घरात लेकी ला surprise म्हणुन.. खुश करण्या साठी बर्गर ची तयारी...आणि दुसरीकडे..... छे ... मनच लागेना...
शेखर शी तशी ओळख फार जुनी नाहीच. Mmk मध्ये जॉब सुरू केला तिथे शेखर आधी पासूनच CA म्हणुन Income tax department handle करत होता. छोटीसी अंग काठी...थोडासा ठेंगणा ... अगदी साधा... शांत पणे बोलणारा... कधीही मी त्याला त्रागा करताना चिडताना पाहिला नाही.... चिडला तरीही शांतपणे, डोळ्यावर चस्मा.... ढेरी थोडी थोडी बाहेर आलेली ... आणि चेहऱ्यावर एक मिश्किल भाव.
नंतर ओळख वाढली... कामाच्या निमित्ताने मैत्री झाली.... Sharing वाढलं.... त्याच्यातला एक लहान बाळ पण हळू हळू दिसायला लागला ... खूप मज्जा करायचो आम्ही. वैभव ... आमच्या मधला एक सुंदर दुआ. शेखर चा बेस्ट फ्रेंड. त्याला समजून घेणारा .. त्याची बाजू मांडणारा ... त्याच्या बाजूने ठाम पणे उभा राहणारा. मात्र, जशी मैत्री वाढली तस बऱ्याच गोष्टी उलगडतात. तशीच शेखर मधल्या लहान बाळाला एक किनार होती ... कसली म्हणायची ही किनार.... दुःखाची की अभिमानाची. दोन टोकं झाली ना. अस्तु...
शेखर चे आई वडील ..दोघांना बोलता ऐकता येत न्हवत. शेखर कसा मोठा झाला असेल. मला खूप कोडी पडायची. आपण किती छोट्या छोट्या गोष्टी घरी शेअर करतो आई बाबां बरोबर. अगदी बोलायला लागल्या पासून. आर्याला किती गोष्टी सांगायची घाई असते... आणि त्या प्रत्येक गोष्टी ला एक प्रतिसाद हवा असतो. आणि स्वाभाविक आहे ना. शेखर नी कसं काढलं असेल हे वय.... शाळा...कॉलेज... सगळंच अबोलातून सांगायचे...प्रतिसाद समजून घ्यायचे . कधी वाटायचं की हा बाळ म्हणता म्हणता आई बाबांचा आई बाबा झाला असेल का. Office मध्ये त्याला खूप बोलायचे की तुझं communication weak आहे. मुळात या क्षुल्लक कारणावरून त्याला काढून टाकावं अस sir ना वाटल ह्याच दुःख आज पण मला आहे. अरे इतकी emphaty नसावी की ज्याला communication चे basic धडे गिरवयला struggle होत त्यांनी स्वबळावर CA ... LLB केलं... किती अभिमानास्पद गोष्ट आहे. अश्या माणसाला तुम्ही support करायचे की हीन वागणूक द्यायची. या वरून स्वतःची किंमत कळते. अस्तु. शेखर नी स्वबळावर खूप मेहनती ने आपलं एक स्वतंत्र स्थान या अश्या सोसायटी मध्ये केले. कौतुक आहेच.
शेखर ला त्याच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने बायको पण खऱ्या अर्थानं अर्धांगिनी मिळाली. कर्तबगार आहेच पण आई बाबांची तेवढ्याच प्रेमानी काळजी पण घेते. शेखर ने तिच्या सोबतीने स्वतःच office सुरू केले... बंगला बांधला... अगदी आई बाबाच्या सोयी साठी घरात लिफ्ट सकट. मला खरच खूप अभिमान वाटतो या मुलाचा. स्वतः चा स्वाभिमान सांभाळून त्यांनी परत मागे वळून पाहिलेच नाही. नंतर मुलगा झाला त्याला. माझ्या सकट अनेक लोकांना प्रश्न पडलाच असणार त्याला येतं का ऐकायला बोलायला. तो झाला तेव्हा त्या दोघांना काय वाटल असेल? काका काकु ना तर कोण आनंद झाला असेल. काका काकू बाहेर पडायला लागले. लोकांना छान भेटू लागले. मुलाचे सूनेच कौतुक डोळ्यातून बोलू लागले होते. त्यांच्या साठी हाच स्वर्ग होता. समाधान मिळाले होते जन्माचे सार्थक झाल्याचे. भेटणाऱ्या ला ही तो आनंद... समाधान दिसायचा... त्याचा मनाचा वेध घेत थेट हृदयात पोहीचायचा.
पण दैव काय असेल ... पुढ्यात काय वाढल असेल ... तोच जाणतो.
शेखर ची आई आजारी पडली. पुण्यात उपचार चालू असताना त्यांना देवज्ञा झाली. दुःखाचा जणू डोंगर कोसळला. काका तुटून गेले. दोघांचे इतके सुंदर coordination होते. अगदी सगळं आयुष्य एकमेकांसाठी जणू. अबोल प्रेम निशब्द प्रेमाची भावना. किती intensity असेल त्यात.
आईचे अंत्यविधी नाशिक येथे करायचे ठरले. आणि formalities अटोपे पर्यन्त उशीर झाला. रात्रीचे १२ झाले निघे पर्यंत. बस. नाशिक ला घरी आलो की काळरात्र संपेल. राहील ते दुःख, पण त्याला काळ एकमेव औषध. प्रवास सुरू झाला परतीचा.
पण देवांनी काही भलतच लिहिलं होतं. नांदूर शिंगोटेला गाडी ला अपघात झाला. नेहमी बिनधास्त आणि तितक्याच शिस्तीने गाडी चालवनारी शिल्पा कशी काय container वर जाऊन धडकली कोणालाच समजले नाही. पुन्हा एकदा सगळं कुटुंब हादरून निघालं.पोटात गोळा आला असेल. शिल्पा ला डोक्याला टाके पडले, शेखर ला हनुवटी ला आणि जबद्याला जबर मार लागला. बाबांना डोक्याला चांगलंच जोरात लागलं. कर्म धर्म संयोगाने अद्वैत ला... त्यांच्या मुलाला काहीही झालं नाही. सोबत आई ला घेऊन येणारी ambulance होती. आईची माया असेल कदाचित पण तीच गाडी आणि त्याच ambulance चा driver धावून आला मदतीला. गुरुजी रुग्णालयात admit केलं. दुसऱ्या दिवशी शेखर ला थोड्या वेळ discharge दिला आई चे क्रिया कर्म करायकला. ते सर्व करून तो परत आला आणि दुसरा घाव दैवाने घातला. पहाटे दुसऱ्या दिवशी बाबा गेले. दुःखाचे डोंगर कोसळले कुटुंबावर. पाया खालची जमीन सरकवी तसा बसला असेल जागेवर. सुन्न मनाने. क्षणात दैवानी रस्त्यावरच्या भिकऱ्या सारखी परिस्थिती केली. सर्वात मोठं जीवापाड जपलेले दागिने कित्येक मोलाचे घेऊन गेला तो.
त्या दिवशी शेखर कडे पाहवत न्हवत. लागल्या मुळे आधीच सुजलेला चेहरा या दुःखाने रडून रडून अजूनच विचित्र दिसत होता. काय करेल तो तरी. कोणाला मिठी मारून हक्कानी रडेल? क्षणात होत्याचं नव्हतं झालं. घर आता खायला उठणार. काल पावेतो बरोबर असणारे आई बाबा आता फक्त आठवणीत राहणार.
म्हणूनच कदाचित सुखाची किनार देवानी या दुःखाला ठेवली. अद्वैत ला काहीही झाल नाही.
पुन्हा एकदा history repeats होणार. अद्वैत खूप मोठा झाला शेखर ला सांभाळताना मला त्या बाळात शेखर चे आई बाबा दिसले.
No comments:
Post a Comment