Sunday, August 25, 2013

क्षण

क्षण ....... धो धो येणाऱ्या पावसा सारखे
चिंब ओले करून जाणारे
आठवणींचा पूर होई पर्यंत बरसणारे

क्षण .......... त्या पन्हाळीतून पडणाऱ्या पाण्या सारखे
एकाच दिशेने वहात जाणारे
वहात वहात मातीत मिसळणारे

क्षण .......... त्या श्रावणातल्या उन्हा सारखे
स्वच्छ...... निर्मळ ........ आठवणीना उजाळा देणारे
मनाला थोडीशी उब देणारे

क्षण .......... त्या समुद्राच्या रेती सारखे
साठवता साठवता ........ सुटलेले हि न समजणारे


No comments:

Post a Comment