Thursday, April 23, 2020

Shankarnath

नाथांची सावली ठेऊन डोक्यावर
मस्तक ठेविले त्यांच्या चरणांवर

न अपेक्षा कसली न बंधनाचा आक्षेप
तुम्ही, त्यांच्याच कार्याचा भाग एक

खडे बोल कधी, कधी प्रेमाने गोंजारणे
सारेच केवळ आमच्या हिता कारणे

होम हवन सेवा साधना अन 
खरा अर्थ भक्तीचा 
सर्व काही उमजू लागले 
खेळ सर्व सक्तीचा अन आसक्तीचा 

जगाचे सार्‍या कल्याण करणारे 
नाव आपले सार्थकी करणारे 
हित - अहित सर्वांचे जपणारे 
प्रसंगी संकट स्वतः ओढवणारे 
असे आमचे आप्पा.... 
भक्तांना त्यांचा भगवंत भेटावणारे! 

नमन माझे त्या शिवाला 🙏
भेटावले मज या शंकराला 
आलो शरण मी या सद्गुरू ला 
आत्ता श्वास माझा मोकळा 
अखेरचे डोळे मिटण्याला!! 


No comments:

Post a Comment